Tamil Nadu Drought : तमिळनाडूच्या २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती आहे. उपलब्ध पिण्याच्या पाण्याची स्थिती याविषयी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यावर पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू शकते. राज्याच्या ईशान्य आणि सागर किनार्यावरील भागांत पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता; मात्र अन्य भागांत विशेषत: पश्चिम भागांत तुलनेने अल्प पाऊस झाला. त्यामुळे पुढील २ महिने पिण्याचे पाणी सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल, त्या दृष्टीने नियोजन करावे, असा आदेश मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिला. पाणीपुरवठा करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे
केरळमध्ये उष्णतेची लाट येण्याची चेतावणी
केरळमध्ये पुढील २ दिवस उष्णतेची लाट येण्याची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पलक्कडमध्ये ४१, तर कोल्लम आणि थ्रिसूर येथे ४० अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
कर्नाटकसासाठी दुष्काळ निधी म्हणून केंद्र सरकारकडून साडेतीन सहस्र कोटी रुपये
कर्नाटकातील दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून ३ सहस्र ४९९ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चेतावणी दिल्यानंतर केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे आभार मानले.