माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
कर्नाटक सरकारने स्थापन केले विशेष अन्वेषण पथक
बेंगळुरू (कर्नाटक) – जनता दल (सेक्युलर) पक्षाचे हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आताचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात येणार आहे. प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. या लैंगिक शोषणाचे एक सहस्रांहून अधिक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. या प्रकरणी कर्नाटक राज्य महिला आयोगाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे चौकशी करण्यासाठी विशेष पथक सिद्ध करण्याची मागणी केली होती. एकीकडे अन्वेषण पथक स्थापन करण्यात येत असतांना दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना २७ एप्रिललाच जर्मनीला रवाना गेले. ते परत कधी येणार, हे स्पष्ट झालेले नाही.
सौजन्य India Today
भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांनी रेवन्ना यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी नवीन गौडा या नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.