Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
व्हि.एस्. धेंपे होल्डिंग्स आस्थापनाच्या वतीने सायबर गुन्हे विभागात तक्रार प्रविष्ट (दाखल)
पणजी : उमेदवार सौ. पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवणार्या वृत्ताचा ‘स्क्रीन शॉट’ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसाारित (व्हायरल) झाला आहे. या खोट्या वृत्तात ‘लोकसभा निवडणुकीनंतर धेंपे उद्योग समूह आणि अदानी समूह एकत्र येणार’, असे म्हटले आहे. याविषयी व्हि.एस्. धेंपे होल्डिंग्स आस्थापनाच्या प्रतिनिधी शर्मिला एस्. प्रभु यांनी रायबंदर येथे सायबर गुन्हे विभागात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, हे वृत्त खोटे आहे. धेंपे उद्योग समुहाला अदानी उद्योग समुहाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच दोन्ही उद्योग समुहांनी संयुक्तपणे कोणताही उपक्रम राबवण्याचा विचार केलेला नाही, तरीही खोटा संदेश सिद्ध करून तो सामाजिक माध्यमात पसरवला जात आहे. हे दुर्दैवी आहे.
सायबर गुन्हे विभाग आवश्यक कारवाई करत आहे आणि यासाठी लोकांनी ही ‘पोस्ट’ पुढे पाठवू नये.