उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !
नागपूर – शिवसेनेच्या आमदारांनी उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचा आदेश दिला. शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, तसेच आमदार सर्वश्री भरतशेठ गोगावले, प्रताप सरनाईक, संतोष बांगर, बालाजी कल्याणकर आणि प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन सादर केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.