धर्मांध मुसलमानांकडून वागरा (गुजरात) येथे हिंदु दुकानदारावर आक्रमण
दुकान जाळण्याचा प्रयत्न !
वागरा (गुजरात) – भरूच जिल्ह्यातील वागरा तालुक्यातील ओचचन गावात धर्मांध मुसलमानांच्या जमावाने हिंदु दुकानदार किशन कुमार कुमावत आणि त्यांची पत्नी यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. किशन कुमार येथील राममंदिराच्या बाहेर किराणा दुकान चालवतात. या वेळी किशन यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना २१ एप्रिल २०२४ ला रात्री घडली. रात्री साडेदहा वाजता आरोपी अब्दुल अहमद पटेल यांची २ मुले किशन यांच्या दुकानातून काही वस्तू घेण्यासाठी आले होते. या वेळी दोघांमध्ये कोणत्यातरी सूत्रावरून वाद होऊन शिवीगाळ झाली. या भांडणाचा आवाज ऐकून अन्य मुसलमान तेथे आले आणि त्यांनी किशन कुमार यांना मारहाण करत दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असे आक्रमण करण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |