‘हलाल’द्वारे चालणार्या ‘आर्थिक जिहाद’विरुद्ध लढा द्या !
‘हलाल जिहाद’ हे आर्थिक स्तरावरील युद्ध आहे. ‘हलाल अर्थव्यवस्थे’तून उभ्या रहाणार्या प्रचंड धनशक्तीमुळे जगभरात ज्या प्रकारे आतंकवाद्यांना साहाय्य केले जात आहे, तसेच भारतात आतंकवाद्यांचे जसे खटले लढवले जात आहेत, त्याच प्रकारे भविष्यात देशविरोधी शक्तींना बळ देण्याचे, त्यांच्यामागे राजकीय शक्ती उभी करण्याचे आणि देशातील यंत्रणांमध्ये घुसखोरी करून त्यांना विकत घेण्याचे षड्यंत्र केले जाऊ शकते. त्यामुळे या ‘आर्थिक जिहाद’चा प्रतिकार करणे आवश्यक आहे, तरच आपण ‘इस्लामिक बँके’ला समांतर उभ्या राहिलेल्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे आणि त्यातून भविष्यात राष्ट्रावर येऊ घातलेले संकट रोखू शकू.
या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात भारतातील राष्ट्रप्रेमी व्यक्ती आणि संघटना यांनी वैयक्तिक स्तरावर अन् संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दृष्टीने कृती करण्यास इच्छुक असणार्यांसाठी पुढे काही प्रयत्न उदाहरणादाखल दिले आहेत. त्यांतून जगभरातील ‘हलाल’ अर्थव्यवस्था रोखणे शक्य नसले, तरी भारताच्या विरोधात होणारी षड्यंत्रे मात्र निश्चितच रोखता येतील.
वैयक्तिक स्तरावर करावयाच्या कृती !
१. हिंदूंचा धार्मिक अधिकार म्हणून ‘हलाल’ मांस खरेदी करणे बंद करा !
२. मांसाहार करणार्यांनी ‘झटका’ मांसाचा आग्रह धरावा आणि तेच विकत घ्यावे !
३. देवतांपुढे बळी देण्याची प्रथा जिथे अस्तित्वात आहे, तिथे झटका पद्धतीचा वापर करा !
४. ‘हलाल’ मांस, तसेच उत्पादन अनिवार्य करणार्यांच्या विरोधात ग्राहक अधिकारांचा भंग करणे, धर्मस्वातंत्र्य नाकारणे आणि धार्मिक भावना दुखावणे, या संदर्भातील तक्रारी प्रविष्ट करा !
५. ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणार्या उत्पादकांची उत्पादने, तसेच ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने विकत घेण्यापूर्वी राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करून अन्य पर्याय उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्य द्या !
६. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या समस्येच्या संदर्भात जनजागृतीच्या हेतूने ‘हिंदु जनजागृती समिती’चा ग्रंथ ‘हलाल जिहाद ?’ स्वतः वाचा, इतरांना भेट द्या आणि व्यापक जागृतीसाठी मोठ्या संख्येने प्रायोजित करा !
संगठीतपणे करावयाच्या कृती !
१. ‘हलाल’मुक्त उत्पादनांची सूची बनवून ती स्थानिक दुकानदारांना उपलब्ध करून द्या !
२. नगरपालिकेद्वारे संचालित पशूवधगृहात केवळ ‘हलाल’ मांस उपलब्ध केले जात असल्यास त्यांच्या विरोधात तक्रार करा ! तसेच त्या ठिकाणी खाटिक समाजाच्या हिंदूंनाही रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा !
३. शासकीय आस्थापनांत केवळ ‘हलाल’ खाद्यपदार्थ दिले जात असल्यास त्याविरुद्ध आंदोलन उभे करा !
४. भारतातील शासकीय ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था वगळता अन्य त्रयस्थ खासगी मुसलमान संस्थांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यास बंदी घालण्याची अन् तो अधिकार शासकीय संस्थेकडे देण्याची मागणी निवेदन, पत्र, ई-मेल, फॅक्स आदींद्वारे करा ! या संदर्भात आंदोलन उभे करून केंद्र आणि राज्य शासनाकडे संघटितपणे तक्रारी करा !
५. ‘हलाल प्रमाणपत्रे’ देणार्या संस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’तून गोळा केलेल्या निधीचा विनियोग कशा प्रकारे करतात ?’, तसेच ‘त्यातून जिहादी आतंकवादी आणि फुटीरतावादी यांना साहाय्य तर केले जात नाही ना ?’, या संदर्भात चौकशी करण्याची मागणी निवेदन, पत्र, ई-मेल, फॅक्स आदींद्वारे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करा !
६. ‘हलाल प्रमाणपत्रे’ देणार्या संस्था ‘प्रस्तुत प्रमाणपत्र कोणत्या कायद्याच्या अंतर्गत वितरित करत आहेत ?’, याविषयीची माहिती ‘माहितीचा अधिकार कायदा, २००५’च्या अंतर्गत प्राप्त करा ! अशा प्रकारचे वितरण अवैध असल्यास त्याविरुद्ध केंद्र आणि राज्य शासनाकडे तक्रार करा ! याविषयी जनहित याचिकेद्वारे अथवा न्यायालयीन मार्गाने बंदीची मागणी करा !
७. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध मागण्यांचे निवेदन बनवून ते स्थानिक व्यापारी संघटना, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘उद्योजक संघटना’, ‘किरकोळ विक्रेते संघटना’ आदींच्या ‘लेटरहेड’वर ‘अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन’ ‘FSSAI’ केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि ‘प्रधानमंत्री कार्यालय’ यांना पाठवा, तसेच हे निवेदन स्थानिक जिल्हाधिकार्यांना द्या !
८. समविचारी अधिवक्त्यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात जागृती बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून ‘माहिती अधिकार’ वापरून या संदर्भातील कायदेशीर माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न करा !
९. जगभरात प्राण्यांच्या संदर्भातील क्रूरता रोखण्यासाठी, मांसविक्रेत्यांकडून रस्त्यावर केल्या जाणार्या पशूहत्येवर बंदी घातली गेली आहे, तसेच ‘हलाल’ करण्यापूर्वी प्राण्याला अचेतन करणे बंधनकारक केले आहे. भारतातही ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६०’ या कायद्यात सुधारणांचा आग्रह धरून ‘हलाल’ प्रथेतील अनुचित कृत्यांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करा !
१०. आपल्या भागातील हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेत्यांना या संकटाची माहिती द्या ! त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात विधानसभेत, तसेच संसदेत शासनाला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा !
११. हिंदु समाजात या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाविषयी जागृती करण्यासाठी व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करा ! या कार्यक्रमात विषय प्रस्तुत करण्यासाठी तुम्हाला ‘हिंदु जनजागृती समिती’ साहाय्य करील.
१२. भारतात व्यवसाय करणार्या आणि हिंदूंनाही ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणार्या ‘मॅकडोनॉल्ड’, ‘के.एफ्.सी.’ इत्यादी बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करा !
येथे कृतीच्या स्तरावरील काही सूत्रे दिलेली आहेत. आपणही आपल्या स्थानिक स्थितीनुसार, कायदेशीरदृष्ट्या योग्य अशा कृती करू शकता !
आज ‘सर्व दृष्टींनी प्रयत्न करून ‘हलाल अर्थव्यवस्थे’तून निर्माण होणारे राष्ट्रावरील संकट रोखण्यासाठी लढा उभारणे’, ही काळाची आवश्यकता आहे. ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे उभ्या केल्या जाणार्या इस्लामी अर्थव्यवस्थेच्या षड्यंत्राला विरोध करून राष्ट्रीय कर्तव्य बजावा !
(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ : हलाल जिहाद ?)