US Police Killed Black Person : किरकोळ कारणावरून अमेरिकेच्या पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या !
पोलिसांनी मानेवर पाय ठेवल्याने श्वास गुदमरून व्यक्तीने सोडले प्राण !
वॉशिंग्टन (अमेरिका) : ओहायो राज्यात फ्रँक टायसन नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीची अमेरिकेच्या पोलिसांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना १८ एप्रिलला घडल्याचे सांगितले जात असून पोलिसांच्या ‘बॉडीकॅम’वरून (शरिरावर लावण्यात आलेला कॅमेरा) चित्रित झालेला व्हिडिओ समोर आला आहे. टायसनच्या हत्येनंतर पोलिसांवर जोरदार टीका होत आहे.
वर्ष २०२० मधील #ICantBreathe
च्या घटनेची पुनरावृत्ती !भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणा या मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे हनन करत असल्याचा खोटा अहवाल देणार्या अमेरिकेला अशा घटनांवरून आता भारताने आरसा दाखवला पाहिजे !
वाचा :https://t.co/bwpARUjfbf#ManipurRiots
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2024
वर्ष २०२० मधील ‘आय कान्ट ब्रीथ’च्या घटनेची पुनरावृत्ती !या घटनेमुळे वर्ष २०२० मध्ये पोलिसांनी मारलेल्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या घटनेचा उल्लेख केला जात आहे. त्याची मानही पोलिसांनी भररस्त्यात अशाच प्रकारे गुडघ्याने दाबून धरली होती. त्याचाही श्वास गुदमरून तो पोलिसांना वारंवार ‘आय कान्ट ब्रीथ’ (मी श्वास घेऊ शकत नाहीये) असे कळवळीने सांगत होता. आताप्रमाणेच तेव्हाही पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि परिणामी त्याने प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेत तत्कालीन ट्रम्प सरकार कृष्णवर्णीय यांच्या विरोधात असल्याचे सांगत तीव्र आंदोलने करण्यात आली होती. |
(सौजन्य : WTOL11)
५३ वर्षीय फ्रँक टायसन या कृष्णवर्णीय नागरिकाची चारचाकी गाडी विजेच्या एका खांबाला धडकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता टायसन जवळच्या क्लबमध्ये असल्याची माहिती मिळाली. एका पोलिसाने त्याच्या मानेवर पाय ठेवल्याचे त्यांच्या ‘बॉडीकॅम’मध्ये चित्रित झाले. त्या वेळी टायसन म्हणत असल्याचे दिसत आहे की, मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. पोलीस त्याला उत्तर देतात की, गप्प बस, तू एकदम ठीक आहेस. यानंतर टायसन ६ मिनिटे भूमीवर बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याचा कोणताच प्रतिसाद येत नसल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने त्याला मृत घोषित केले.
संपादकीय भूमिकाभारत सरकार आणि संरक्षण यंत्रणा या मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे हनन करत असल्याचा खोटा अहवाल देणार्या अमेरिकेला अशा घटनांवरून आता भारताने आरसा दाखवला पाहिजे ! |