महिला प्रवाशाला त्रास देणार्‍या वासनांध तरुणांना केले पोलिसांच्या स्वाधीन !

  • ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’ या खासगी बस आस्थापनाच्या चालकाची स्तुत्य कृती !

  • पोलिसांनी युनुस, गौस आणि सादिक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून घेतले कह्यात !

गदग (कर्नाटक) – देशातील सर्वांत मोठे खासगी बस आस्थापन असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’च्या चालकाने नुकतीच एक स्तुत्य कृती केली आहे. प्रसंगावधान राखून त्याने एका महिला प्रवाशाला त्रास देणार्‍या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना गदग येथील असून येथे २४ एप्रिलच्या रात्री हुब्बळ्ळीहून भाग्यनगरला जाणार्‍या बसमध्ये एक हिंदु महिला चढली. तिने आरक्षित केलेल्या जागेवर एक तरुण झोपला होता. तिने त्याला त्याच्या जागी जाण्यास सांगितले. त्यावर त्याने आणि त्याच्या मित्रांनी वाद घालण्यास आरंभ केला. या वेळी त्यांनी तिच्याशी गैरवर्तनही केले. महिलेने बस चालकाचे साहाय्य मागितले असता त्याने प्रसंगावधान राखून बस स्थानिक पोलीस ठाण्याकडे वळवली. पोलिसांनी बसमधील १५ जणांची चौकशी करून हुब्बळ्ळी येथील रहिवासी महंमद युनुस मुन्नासाब मुदगल, महंमद गौस रहिमसाब शिरहट्टी आणि महंमद सादिक जाफरसाब शेखाबादे यांच्याविरुद्ध कलम ११० अन्वये गुन्हा नोंदवला. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे.