भाग्यनगर (तेलंगाणा) लोकसभा मतदारसंघातील ६ लाख मतदारांची नावे निवडणूक आयोगाने हटवली
निकालावर परिणाम होण्याची शक्यता !
भाग्यनगर (तेलंगाणा) – निवडणूक आयोगाने भाग्यनगर लोकसभा मतदारसंघातील अनुमाने ६ लाख मतदारांची नावे हटवली आहेत. वगळलेली नावे मरण पावलेल्या व्यक्ती, इतरत्र स्थायिक झालेले नागरिक किंवा बनावट होती. याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. येथे वर्ष २००२ पासून एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी निवडून येत आहेत. ‘हटवण्यात आलेल्या मतदारांच्या नावाने होणार्या बोगस मतदानातून ओवैसी निवडून येत होते’, असा दावा केला जात आहे.