Pastor Domnic D’Souza Conversion Issue : बिलिव्हर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा याला पत्नीसह उत्तर गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार !
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशावर मुख्य सचिवांचीही मोहोर !
पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) : बिलिव्हर्सच्या शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी यांना उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी यापूर्वीच दिला आहे. या आदेशाला पास्टर डॉम्निक डिसोझा याने राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणा यांच्याकडे आव्हान दिले होते. राज्याच्या मुख्य सचिवांनी हा आव्हान अर्ज फेटाळल्याने दोघांनाही आता उत्तर गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार आहे.
Pastor Domnic D’Souza Conversion Issue : बिलिव्हर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा याला पत्नीसह उत्तर गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार !
वाचा :https://t.co/A6w25iZ6sZ#NoConversion #BreakingNews #Goa
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांच्या आदेशावर मुख्य सचिवांचीही मोहोर !
पास्टर डॉम्निक… pic.twitter.com/bkVslQuFhQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2024
पास्टर डॉम्निक डिसोझा याच्या विरोधात वर्ष २००९ पासून पोलिसांत ९ तक्रारी नोंद झालेल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे त्याच्या विरोधात गुन्हेही नोंद झाले आहेत. यांमधील धर्मांतराशी संबंधित ३ गुन्हे आणि अन्य कलमांखाली ६ गुन्हे मिळून एकूण ९ गुन्हे नोंद झालेले आहेत. म्हापसा पोलीस ठाण्यात ७, तर गुन्हे अन्वेषण विभागात २ गुन्हे नोंद झालेले आहेत. सध्या कुर्टी, फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या एका नागरिकाने हल्लीच पास्टर डॉम्निक डिसोझा याच्या विरोधात काळी जादू करून धर्मांतर केल्याची तक्रार म्हापसा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर पास्टर डॉम्निक याला जानेवारी २०२४ मध्ये कह्यात घेऊन त्याची पुढे सशर्त जामिनावर सुटका झाली होती.