गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ !
हत्तीच्या आक्रमणात १ शेतकरी ठार, ३ महिला गंभीर घायाळ !
गडचिरोली – जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील कियर येथील शेतशिवारात काम करत असलेला शेतकरी गोंगलू तेलामी यांना पायाखाली तुडवून ठार केले. त्याच रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून ३ महिलांना गंभीर घायाळ केले. महारी वड्डे (५० वर्षे), राजे आलामी (वय ५० वर्षे) आणि वंजे पुंगाटी अशी त्यांची नावे आहेत. तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यातील दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात २ शेतकर्यांना ठार करून ३ दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला आहे.