सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम !
सोलापूर – जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नव्या इमारतीच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ येत्या १ मे या दिवशी होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणार्या या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या हस्ते पायाभरणी होणार असून अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ११ मजली असलेल्या या इमारतीत २७ न्यायालये आणि अन्य कार्यालये यांचा समावेश आहे.