Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून प्रचार चालू असतांना जिल्हा प्रशासनाने बजरंग दलाचे माजी जिल्हा संचालक तुडुकुरू मंजू यांना तडीपार करण्याचा आदेश काढला आहे. (काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) या मागील कारण समजू शकलेले नाही.