‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
अक्कलकोट – ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’स ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून ‘सी.एस्.आर्.’ (सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देण्यात येणारा निधी) निधीतून ताट, वाट्या धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र (डिश वॉशर मशीन) अन्नछत्र मंडळाला भेट देण्यात आले. या प्रसंगी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे उपमहाप्रबंधक पंकजकुमार बरनवाल, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी सौ. निलमताई सामंत, न्यासाचे अभियंता किरण पाटील, अमित थोरात यांसह अन्य उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी भक्तांची वाढती गर्दी पहाता न्यासाचा भक्तांच्या सेवेसाठी विविध उपाययोजना करण्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. एका छताखाली न्यासाकडून महाप्रसादासमवेत अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.