नागपूर येथील कु. श्रीवल्लभ जोशी (वय १५ वर्षे) याला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यानंतर भवानीमातेचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मला संध्याकाळी सत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. त्यानंतर लगेच मी भवानीमातेचे दर्शन घेण्यासाठी गेलो.
अ. मी तेथे जाताच माझा ‘ॐ श्री मातृये नमः ।’ असा नामजप चालू झाला.
आ. माझे संपूर्ण शरीर चैतन्याने भरून गेले.
इ. मी भवानीमातेचे एक वेगळेच रूप पाहिले, जे मी आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते. मला त्या रूपाची दैवी शक्ती पुष्कळ जाणवत होती.
२. बासरी वाजवतांना आलेल्या अनुभूती
मी भवानीमातेचे दर्शन घेतल्याचा दुसर्या दिवशी सायंकाळी आश्रमात बासरी वाजवत असतांना माझ्या बोटाला कुणाचा तरी स्पर्श जाणवला. ‘तिच शक्ती माझ्याकडून बासरी वाजवून घेत आहेत’, असे मला वाटले. बासरी वाजवून झाल्यावर मला समजले की, ‘माझ्याकडून एक नवी धून त्या शक्तीने सिद्ध करून घेतली आहे.’
३. गणपतीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
बासरी वाजवून झाल्यावर मी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो.
अ. तेथे गेल्यावर माझा ‘ॐ श्री महागणाधिपतये नमः ।’ असा नामजप चालू झाला.
आ. ‘माझ्या डोक्यावर कुणीतरी हात ठेवला आहे’, असे मला जाणवत होते.
इ. दुसर्या दिवशीही मला असेच सतत जाणवत होते.’
– कु. श्रीवल्लभ जोशी (आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १५ वर्षे), नागपूर (३०.५.२०२३)