पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे येथे २९ एप्रिल या दिवशी होणारी सभा ‘स.प. महाविद्यालया’च्या मैदाना ऐवजी ‘रेस कोर्स’ मैदानावर होणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे. सभेसाठी स.प. महाविद्यालयाचे मैदान लहान पडू शकते, यामुळे जागा पालटण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बारामती लोकसभेचे मतदान ७ मे या दिवशी आणि पुणे, शिरूर अन् मावळ या मतदारसंघांसाठी १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. महायुतीकडून बारामतीमध्ये सौ. सुनेत्रा पवार, पुणे येथे मुरलीधर मोहोळ, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळमधून श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.