चकमा जमातीच्या निर्वासितांना आसामी जनता स्वीकारणार नाहीत ! – विरोधी पक्ष
१ लाख चकमा जमातीच्या निर्वासितांना अरुणाचल प्रदेशातून आसाममध्ये हलवण्याच्या किरेन रिजिजू यांच्या वक्तव्याचे प्रकरण
गौहत्ती (आसाम) – दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशात वास्तव्यास असलेल्या १ लाख चकमा आणि हाजोंग या जमातींच्या निर्वासितांना निवडणुकीनंतर आसाममध्ये हलवले जाईल, असे वक्तव्य केले होते. ही कारवाई नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत करण्यात येईल, असेही ते म्हणाले होते.
Kiran Rijiju's statement on relocating 1 lakh Chakma tribal refugees from #ArunachalPradesh to #Assam
Assamese people will not accept Chakma tribal refugees! – Opposition#Assam#KiranRijiju#Refugees pic.twitter.com/WDfoAJm6bY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. आसाम जातीय परिषद आणि काँग्रेस यांनी म्हटले की, निर्वासितांना राज्यात वास्तव्याला येऊ दिले जाणार नाही. रायजोर दलाचे आमदार अखिल गोगोई म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी केंद्र सरकारपुढे शरणागती पत्करली आहे. आसामचे लोक चकमांचे स्थलांतर स्वीकारणार नाहीत.
सौजन्य Prag News
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, केंद्र सरकारने त्यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाने वर्ष २०२१ मध्ये अरुणाचल प्रदेशला केवळ चकमा आणि हाजोंग यांची जनगणना थांबवण्याचे निर्देश दिले होते.