‘लँड जिहाद’
देशातील मोक्याचा सागरी किनारा, सीमाभाग इत्यादी आणि हिंदू बहुसंख्य असलेला अधिकाधिक भाग नियोजनबद्धरित्या मुसलमानबहुल करणे, त्यासाठी हिंदूंची भूमी वा घरे आर्थिक प्रलोभने दाखवून, फसवणूक करून किंवा बलपूर्वक विकत घेऊन तेथे मुसलमानांची वस्ती वाढवणे आणि हिंदूंना तेथून अक्षरशः पळवून लावणे म्हणजे ‘लँड (भूमी) जिहाद’ ! हिंदूंच्या संदर्भात जे प्रारंभी काश्मीर आणि आता आसाममध्ये होत आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज भारताच्या अनेक राज्यांत चालू झाली आहे.
भारताचे इस्लामीस्तान करणे हे ‘लँड जिहाद’चे लक्ष्य !
हिंदूंच्या भूमी मोठ्या किमती देऊन विकत घ्यायच्या आणि अधिकाधिक संवेदनशील अन् मोक्याच्या भूभागांवर नियंत्रण मिळवून देशभरात इस्लामीस्तान निर्माण करण्याचा मुसलमानांचा डाव आहे. सध्या ‘मिनी पाकिस्तान’च्या नावाने जे भाग ओळखले जातात, ती त्या व्यापक षड्यंत्राचीच पूर्वसिद्धता आहे.
हिंदूंची भूमी बळकावण्याच्या धर्मांधांच्या पद्धती !
१. हिंदूबहुल भागात मोठी रक्कम देऊन भूमी विकत घेणे
२. शासनाकडून धार्मिक स्थळासाठी भूमी मिळवणे
३. शासकीय, विकत घेतलेल्या अथवा हडपलेल्या भूमीवर प्रार्थनास्थळे उभारणे
४. हिंदूंशी सलोख्याचे संबंध ठेवून मुसलमानांची वस्ती वाढवणे
५. मुसलमानांची वस्ती वाढल्यावर त्यांनी हिंदूंना विविध त्रास देऊन त्यांचा कोंडमारा करणे : हेतूतः हिंदूंच्या घरासमोर कचरा टाकणे, त्यांच्या संपत्तीची हानी करणे, छोट्या गोष्टींवरून भांडण करून त्यांना मारहाण करणे आणि अन्य हिंदूंवर स्वतःची दहशत निर्माण करणे, असे प्रकार चालू रहातात. या त्रासाला कंटाळलेल्या हिंदूंना घर सोडून जाण्याविना पर्याय रहात नाही.
६. हिंदूंना त्यांच्या जागा आणि घरे मुसलमानांना अल्प किमतीत विकण्यास भाग पाडणे
७. घरे न सोडणार्या हिंदूंना भीती दाखवून पळवून लावणे
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)
दंगलीनंतर ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे हिंदूंना स्थलांतर करणे भाग पाडले !
१. २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री ठाणे येथे दंगली झाली. त्यानंतर हिंदूंना राबोडी (ठाणे) येथे रहाणे धोक्याचे वाटत असल्याने त्यांनी स्थलांतर केले. तेथील अनेक हिंदूंना घरे विकायची होती. मुसलमान घर घेण्यास सिद्ध असले, तरी त्यांच्याशी व्यवहार करण्यास हिंदू सिद्ध नव्हते. त्यामुळे दंगली घडवून हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांना राबोडी सोडण्यास भाग पाडायचे आणि राबोडी भाग कह्यात घ्यायचा, असा प्रयत्न झाला.
२. कल्याण आणि भिवंडी येथील दंगलींनंतर त्या भागांतील हिंदूंची वस्ती अशाच पद्घतीने हद्दपार करण्यात आली.
काश्मीरमधून विस्थापित केलेल्या हिंदूंची परवड !
काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती म्हणतात –
१. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी सुसंस्कृत काश्मिरी हिंदु समाजाला काश्मीरमधून हाकलण्यासाठी अमानुष हत्याकांड चालू केले. त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व संपत्तीवर पाणी सोडावे लागले.
२. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणार्या या कुटुंबांवर आता निर्वासितांच्या छावण्यांमध्ये दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. सुमारे साडे तीन लाख काश्मिरी पंडित देहली आणि जम्मू येथील छावण्यांत आजही खितपत पडले आहेत.
३. प्रत्येकी १ शयनकक्ष आणि स्वयंपाकघर अन् ४ कुटुंबांमागे १ शौचालय आणि स्नानगृह, अशी या छावण्यांची रचना आहे.
४. या समाजातील पारंपरिक एकत्र कुटुंबपद्घती अपुर्या जागेमुळे कधीच नामशेष झाली. घरात कुणालाही एकांत मिळत नसल्याने कुटुंबांमधील तणाव आणि घटस्फोट यांचे प्रमाण वाढले आहे.
५. या छावण्यांत जन्माचे प्रमाण घटत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
६. स्वतःच्याच देशात त्यांना निर्वासिताचा शिक्का माथी घेऊन जगावे लागत आहे. निर्वासित हिंदूंना काय भोगावे लागत आहे, हे यातून लक्षात येते. उद्या आपल्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर याविषयी जागृती करणे आवश्यक आहे.
जम्मू येथील सहस्रो एकरचा ‘लँड जिहाद’ उघड केल्याचा परिणाम !
‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांच्या विरोधात केरळमध्ये अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, ११ मार्च २०२० या दिवशी ‘झी न्यूज’वर प्रसारित झालेल्या ‘डी.एन्.ए.’ या कार्यक्रमामध्ये सुधीर चौधरी यांनी मुसलमानांना अपमानित केले. यात चौधरी यांनी जिहादविषयी सारणी दाखवली होती.
जिहादी आतंकवाद्यांच्या विळख्यातील काश्मीरमधील हिंदूंची दु:स्थिती !
काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य, तर हिंदू अल्पसंख्य आहेत. तेथील मुसलमानांची लोकसंख्या ९७ टक्के, तर काश्मीरच्या खोर्यात हिंदू आणि शीख यांची एकत्रित लोकसंख्या केवळ २.५ टक्के आहे. तेथे बौद्धांची संख्याही अत्यल्पच आहे. आतंकवादामुळे तेथील ३.५ लाख काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले आहे. ते आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. या धगधगत्या समस्येवर साप्ताहिक चित्रलेखाने प्रकाशझोत टाकला. त्यातील काही सूत्रे येथे देत आहोत.
आतंकवाद्यांच्या भीतीने ३.५ लक्ष काश्मिरी परागंदा !
वर्ष १९८९ मध्ये काश्मीर खोर्यात खर्या अर्थाने दहशतीला प्रारंभ झाला. आतंकवादी कारवाया, त्यांच्याकडून मिळणार्या धमक्या आदींमुळे
१. वर्ष १९८९ मध्येच ३.५ लक्ष काश्मिरी पंडितांनी जिवाच्या भीतीने काश्मीर सोडले.
२. किमान ५ लक्ष स्थानिक काश्मिरी पंडितांना त्यांच्या पूर्वजांची भूमी आणि शेती यांवर पाणी सोडावे लागले.
३. अनेकांनी जम्मू सोडून देशाच्या इतर भागांत त्यांचे बस्तान बसवले, तर काहींनी जम्मू किंवा अन्य ठिकाणच्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला. ते तेथे वर्षानुवर्षे रहात आहेत.
४. अनेकजण बंद पडलेल्या जुन्या शाळांमध्ये आश्रयाला आहेत, तर काहींनी नद्यांच्या किनारी तंबू ठोकले आहेत.
(संदर्भ : साप्ताहिक ‘चित्रलेखा’)