Complaints Election Malpractices : निवडणुकीतील अपप्रकारांविरोधात ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर तक्रार नोंदवता येणार !
मुंबई : निवडणुकीतील व्यय, अपप्रकार, सदोष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ई.व्ही.एम्), यांविषयी, तसेच मतदार नोंदणी, मतदान केंद्र आदींविषयी ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’ (नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल)वर ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पोर्टल उपलब्ध आहे.
‘https://ngsp.eci.gov.in/’ आणि ‘https://tmp.eci.gov.in/electors’ या लिंकवर नागरिकांना तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदवल्यावर ई-मेलवर तक्रार नोंदवल्याचा संदेश प्राप्त होणार आहे.
Complaints against #malpractices in #LokSabhaElections2024 can be made on the NGSP Portal
Citizens will be able to lodge complaints on the following links
Post filing the complaint, a notification regarding the same will be… pic.twitter.com/W9bxGmx4BF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2024
मुंबईतील ६ सहस्र ९२८ तक्रारी निरर्थक !
‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर मुंबईसह उपनगरांमध्ये एकूण ७ सहस्र ९१४ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यांपैकी ६ सहस्र ९२८ तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले.