पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्‍वसनीय कार्य करत आहेत ! – जेमी डिमॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘जेपी मॉर्गन’ बँक, अमेरिका

  • अमेरिकेतील ‘जेपी मॉर्गन’ या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांचे भारताच्या पंतप्रधानांविषयी कौतुगोद्गार

  • ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी अविश्‍वसनीय कार्य करत आहेत. मोदी यांना भारतातील प्रसारमाध्यमे विरोध करत असतांनाही त्यांनी ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याचे महत्कार्य केले आहे, असे कौतुकोद्गार जागतिक बँक असलेल्या जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढले.

ते येथे आयोजित ‘इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्क’ नावाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते.

सौजन्य CNBC-TV18

डिमॉन पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कणखर नेते असून त्यांनी अत्यंत अवघड कार्य केले आहे. आपण त्यांना सल्ले देत बसतो; परंतु त्यांनी अत्यंत अविश्‍वसनीय कार्य केले आहे. त्यांनी ७० कोटी लोकांनाी बँकेत खाती उघडून दिली आहेत. या एकाच व्यक्तीमुळे संपूर्ण देश विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारतात २९ राज्ये असून ते अगदी युरोपप्रमाणे आहे; कारण भारतातील प्रत्येक राज्यात पूर्णपणे वेगवेगळी कररचना आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत, असे डिमॉन म्हणाले.