अलवर (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबाच्या लग्नाच्या वरातीवर मुसलमानांचे मशिदीसमोर आक्रमण !

प्रतिकात्मक छायाचित्र

अलवर (राजस्थान) – राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका हिंदु कुटुंबाच्या लग्नाची वरात मशिदीसमोर पोचली असता मुसलमान जमावाने त्यावर आक्रमण केले. या आक्रमणात लग्नातील अनेक पाहुणे घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

या वेळी महिलांची छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून ४ जणांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

सौजन्य Capital TV Uttar Pradesh

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, लग्नाच्या मिरवणुकीत ‘डीजे’ (मोठा ध्वनीक्षेपक) वाजत होता. गावातून मार्गक्रमण करत मिरवणूक मशिदीसमोर पोचली असता मुसलमान समाजातील काही लोक बाहेर आले आणि त्यांनी ‘डीजे’ बंद करण्यास सांगितले. मिणवणुकीत सहभागी झालेल्या पाहुण्यांनी त्यास नकार दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद चालू झाला. या वादात अचानक लग्नाच्या वरातीवर मुसलमान जमावाने दगडफेक चालू केली, तसेच या जमावाने वरातीतील लोकांना लाठी-काठ्यांनी मारहाण केली. घायाळ झालेल्यांमध्ये तरुणी आणि महिला यांचाही समावेश आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला. पोलिसांना पहाताच आक्रमण करणार्‍या मुसलमानांनी पळ काढला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

मशिदीसमोरून लग्नाची वरातही गेलेली सहन न होणार्‍या मुसलमानांच्या दिवसातून ५ वेळा ध्वनीक्षेपकावरून करण्यात येणार्‍या नमाजपठणाचा आवाज हिंदूंनी का म्हणून सहन करायचा ?