Uttarakhand Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु नाव सांगून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !
डेहराडून (उत्तराखंड) येथे लव्ह जिहाद !
डेहराडून (उत्तराखंड) – येथे शावेज अली याने हिंदु नाव सांगून एका हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिची लाखो रुपयांची फसवणूक केली. बलात्कारामुळे ही महिला गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यासही शावेज याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी शावेज अली याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
Love J!h@d in Dehradun (Uttarakhand)!
A Mu$l!m youth entraps a #Hindu woman into the web of love by citing a Hindu name
It's not the Mu$l!ms, but #Hindus and their daughters of this country who are unsafe, as this incident demonstrates! It is to be noted that the pseudo… pic.twitter.com/2TggViR1MZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
१. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, दीड वर्षांपूर्वी शावेज अली याने ‘लकी’ नावाने तिची भेट घेतली होती. काही दिवसांतच दोघांचे दूरभाषवर बोलणे चालू झाले. त्यानंतर शावेजने पीडितेला लग्नासाठी विचारणा केली. त्याने लग्नाचे आमीष दाखवून पीडितचे लैंगिक शोषण चालू केले. यात ती २ वेळा गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
२. एके दिवशी शावेजने लग्नापूर्वी व्यवसाय प्रारंभ करण्याच्या नावाखाली पीडितेकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. पीडितेने कुठून तरी व्यवस्था करून पैसे आरोपीला दिले. आतापर्यंत शावेजने पीडितेला हे पैसे परत केलेले नाहीत.
३. पीडितेने लग्नासाठी विचारणा केल्यावर लकी याने त्याची खरी ओळख, म्हणजे तो शावेज असल्याचे सांगितले. ‘मुसलमान असल्याने मी विवाह करू शकत नाही’, असेही तो म्हणाला.
४. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकादेशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांच्या मुली असुरक्षित आहेत, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |