कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !
छत्रपती संभाजीनगर – ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने कथित प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याविषयी कोणतेही पुरावे नाहीत’, असे सांगून राज ठाकरे यांच्यावरील खटला फेटाळून लावला आहे. १६ वर्षे जुन्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका फेटाळली होती. या आदेशाला राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
काय आहे प्रकरण ?
२१ ऑक्टोबर २००८ या दिवशी धाराशिव जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी. बसगाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला होता. वर्ष २००८ मध्ये राज ठाकरे यांनी बिहार आणि उत्तरप्रदेश येथील स्थलांतरित कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकर्या काढून घेतल्याचा आरोप केला होता. मुंबई येथे रेल्वे प्रवेश परीक्षेला बसणार्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणार्या पक्ष कार्यकर्त्यांना भडकवल्याविषयी ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.