छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या हातून निसटला !
एका आरोपीला अटक !
छत्रपती संभाजीनगर – चोरलेला भ्रमणभाष संच विक्री करण्यासाठी आलेल्या २ अल्पवयीन चोरट्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक गेले; मात्र २ चोरट्यांपैकी एक चोरटा गुन्हे शाखेच्या तावडीतून पळला, तर दुसर्या गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. त्याच्याकडून १ भ्रमणभाष संच आणि २ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. चोरट्याने बेगमपुरा आणि सिडको पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातून दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे. शतपावली करतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी हातातील भ्रमणभाष संच हिसकावून पळ काढल्याची घटना २२ फेब्रुवारी या दिवशी कोटला कॉलनी येथे घडली होती. रवि महाबळे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
संपादकीय भूमिकाअल्पवयीन गुन्हेगारांना पकडून न ठेवणारे पोलीस शस्त्रधारी सराईत गुन्हेगारांना पकडू शकतील का ? असे पोलीस खात्याला कलंक आहेत ! |