लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे बालसाधक कु. श्रीराम महाजन आणि कु. अर्जुन देशपांडे यांना मिळाले सुयश !

इयत्ता तिसरीची मंथन राज्यस्तरीय परीक्षा आणि एम्.टी.एस्. ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा

कु. श्रीराम महाजन

लांजा (जिल्हा रत्नागिरी) – येथील सनातनचे बालसाधक कु. श्रीराम उपेंद्र महाजन आणि कु. अर्जुन सम्राट देशपांडे यांना तिसरी मंथन राज्यस्तरीय अन् एम्.टी.एस्. (MTS) ऑलिम्पियाड या परीक्षांमध्ये सुयश मिळाले आहे. कु. श्रीराम आणि कु. अर्जुन यांनी एम्.टी.एस्. परीक्षेत ‘रौप्य पदक’ मिळवलेले आहे. त्यांच्या या यशाविषयी सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

कु. श्रीराम उपेंद्र महाजन याला मंथन परीक्षेत ३०० पैकी २०८ गुण मिळाले. या परीक्षेत त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत ३३ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ४७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच एम्.टी.एस्. परीक्षेत श्रीरामला ३०० पैकी १८२ गुण मिळाले असून त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत १६ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ५५ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

कु. अर्जुन देशपांडे

कु. अर्जुन सम्राट देशपांडे याला मंथन परीक्षेत ३०० पैकी २२८ गुण मिळाले आहेत. त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत २३ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ३७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच एम्.टी.एस्. परीक्षेत त्याला ३०० पैकी २२० गुण मिळाले आहेत. यामध्ये त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत ८ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ३६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

कु. श्रीराम उपेंद्र महाजन याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के असून कु. अर्जुन सम्राट देशपांडे याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे. कु. श्रीराम आणि कु. अर्जुन यांनी त्यांच्या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे.