हिंदूंमध्ये शौर्यवृद्धी व्हावी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात १२ ठिकाणी गदापूजन !
नंदुरबार – हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातही १२ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. नंदुरबार येथे श्री मोठा मारुति मंदिर येथे श्री मोठा मारुति मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. अशोक अण्णा चौधरी, नंदुरबार येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री. नीतेश भैया अग्रवाल, तसेच सचिव श्री. कल्याण पाटील श्री. भास्कर मराठे यांच्या हस्ते गदापूजन पार पडले. गदापूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.