ठाणे येथे गणेशोत्सव मंडळाला ‘लव्ह जिहाद’च्या उल्लेखामुळे पोलिसांची नोटीस !

‘लव्ह जिहाद – आतंकवादाचा गुलाबी चेहरा’ या विषयावरील देखावा ठाण्यातील हिंदु जागृती गणेशोत्सव मंडळाने बनवला होता. ‘हा देखावा काढून टाकावा’, अशा आशयाची नोटीस ठाणे पोलिसांनी दिली. या नोटिसीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

सुनावणीच्या वेळी ‘मुसलमानांना वाईट वाटेल म्हणून गणेशोत्सवाच्या देखाव्यात ‘लव्ह जिहाद’ म्हणू नका आणि उर्दू शब्द काढा’, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि तत्कालीन न्यायमूर्ती आर्.वाय. गाणू यांनी गणेशोत्सव मंडळाला दिला.

लव्ह जिहाद प्रकरणातील सर्वाेच्च न्यायालयाचे मत विचार करायला लावणारे !

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणी अखिला आणि शफीन जहान यांचा विवाह केरळ उच्च न्यायालयाने कलम २२६ अंतर्गत रहित केला. या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ‘वडील हे मुलीच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत’, असे ३.१०.२०१७ या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने असे म्हटले.

धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते. सध्या हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माविषयीचा स्वाभिमान नाही. त्यामुळे हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी झाली आहे. – एक धर्मप्रेमी