Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !
लंडन (इंग्लंड) – पाकिस्तानी अल्पसंख्यांकांसाठी लढणारी ब्रिटनच्या संसदेतील ‘ऑल पार्टी पार्लामेंट्री ग्रूप फॉर पाकिस्तानी मायनॉरिटीज’ नावाची संस्था पाकवर आधारित एक संशोधन करत आहे. त्यासाठी या संस्थेने ‘गुलाम बनवून मजुरीचे बलपूर्वक काम करून घेणे आणि याचा धार्मिक अल्पसंख्यांकांवर होत असलेला परिणाम’ या विषयावर संशोधन चालू केले आहे. या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
यासाठी या संस्थेने पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्य करणार्यांना या विषयावरील आकडेवारी, माहिती अथवा गुन्ह्यांच्या नोंदी २९ एप्रिलपर्यंत मागवल्या आहेत. वरील माहिती info@insightuk.org या संगणकीय पत्त्यावर ई-मेल करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. पाकिस्तानातील हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबईतील श्री. महेश वासू यांनी ‘सनातन प्रभात’ला ही माहिती दिली.
मीरपुरखास येथे दोन मुसलमानांनी केली हिंदु तरुणाची हत्या !पाकच्या सिंध प्रांतात असलेल्या मीरपुरखास येथे गेल्या माहिन्यात ३० मार्चला झालेल्या घटनेत २ मुसलमानांनी कांजी मेघवार नावाच्या हिंदु युवकाची गोळ्या झाडून हत्या केली. समीर आणि अब्दुल गफूर अशी आरोपींची नावे आहेत. कांजी हे कराचीमधील एक कपड्याच्या दुकानात काम करत होते. यासंदर्भात येथील सेहराब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयीचे वृत्त उर्दू दैनिक ‘अवामी आवाज’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ही माहिती पाकिस्तानातील हिंदूंसाठी कार्य करणार्या मुंबईतील श्री. महेश वासू यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
संपादकीय भूमिकापाकिस्तानमधील असुरक्षित अल्पसंख्यांक हिंदू ! |