‘जी २०’साठी केलेल्या झाडांवरील रोषणाई ७ दिवसांत हटवा !
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे विभागांना आदेश !
(‘जी २०’ म्हणजे २० राष्ट्रांचा समूह, जो जागतिक घडामोडीच्या चर्चेसाठी शिखर परिषदेचे आयोजन करते.)
मुंबई – ‘जी २०’ परिषदेसाठी काही मासांपूर्वी मुंबईतील विविध परिसरातील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई अजूनही हटवलेली नाही. ती पुढील ७ दिवसांत तात्काळ हटवावी, तसेच रोषणाई हटवण्यात येत नाही, तोपर्यंत दिवे बंद ठेवावेत, असे लेखी आदेश न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. मुंबईतील सर्व झाडांवरील रोषणाई २३ एप्रिलपर्यंत हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रत्येक वेळी न्यायालयांना विविध यंत्रणांना निर्देश का द्यावे लागतात ? निष्क्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांना शासन कधीपर्यंत पोसणार ?