शिरूर (जिल्हा पुणे) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये चोरी !
चोरांनी दानपेटीतील रोख रक्कम आणि देवीचे मंगळसूत्र चोरले !
शिरूर (जिल्हा पुणे) – मुख्य बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात दानपेटी फोडून चोरांनी रोकड आणि पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. मंदिराचा सुरक्षा रक्षक पोपट घनवट याने प्रतिकार केला असता त्याला लोखंडी सळईने मारहाण करून बांधून ठेवून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २० एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजता घडली. दानपेटीमध्ये २ लाख रुपये असावेत, असे अनुमान मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी वर्तवले असून पोलीस दप्तरी ३० सहस्र रुपयांची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक घनवट यांनी दिलेल्या तक्रारीवरून ३ चोरांविरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस मंदिर आणि परिसरातील सी.सी.टी.व्ही. चित्रण पाहून पुढील अन्वेषण करत आहेत.