हनुमान जयंती
चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)