नामजप करत असतांना साधकाला देवाने सुचवलेली भावपूर्ण प्रार्थना !
‘एकदा मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा मला प्रार्थना सुचली, ‘हे करुणाकरा, हे दयाघना, हे श्रीमन्नारायणा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आता काही वर्षांतच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे. आम्हा पामरांकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या. या साधनेच्या मार्गावर अनेक मायारूपी विचारांचे काटे आहेत. ते काटे पार करण्यासाठी आणि साधना करतांना होणार्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तुम्हीच आम्हाला शक्ती द्या. हे कृपावंता, तुमची कृपाळू दृष्टी आम्हा विष्णुभक्तांवर सतत राहू दे. आम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमचे पुष्पक विमान सिद्ध आहे. आमची त्यात बसण्यासाठी पात्रता नाही. त्या मार्गावर आमचे पाऊल पडण्यासाठी आमच्यामध्ये साधना करण्याची जिद्द आणि तळमळ निर्माण करा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |