पुणे येथे १२ वर्षांपासून रहाणार्या ४ बांगलादेशी महिलांना अटक !
पुणे – येथील बुधवार पेठेमध्ये विनापरवाना राहून देहविक्री करणार्या ४ बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कह्यात घेतले आहे. मासुका शेख, पिया शेख, रुजी शेख आणि रूपा मंडोल अशी त्यांची नावे असून अन्य ५ महिलांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या बांगलादेशी महिलांकडे भारतामध्ये रहाण्याची अधिकृत कागदपत्रे अन्वेषणामध्ये आढळून आली नाहीत, तसेच या महिला गेल्या १२ वर्षांपासून बुधवार पेठेतील वेश्यालयामध्ये रहात आहेत. त्यांच्यावर पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|