हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. संकेत भोवर यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
१. हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील मारुतिरायाच्या मूर्तीला प्रार्थना करणे
१ अ. साधकाने प्रार्थना करतांना डोळे मिटल्यावर त्याला ‘मारुतिराया खांद्यावर गदा घेऊन ‘राम राम’ म्हणत मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत आहे’, असे दिसणे : ‘६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील मारुतिरायाच्या मूर्तीला प्रार्थना केली. मारुतिरायाने माझ्याकडून तळमळीने प्रार्थना करून घेतली. मी डोळे मिटल्यावर मला दिसले, ‘मारुतिराया गदा खांद्यावर घेऊन मंदिराच्या भोवती ‘राम राम’ म्हणत प्रदक्षिणा घालत आहे.’ त्याला पाहून माझा भाव जागृत झाला. मला हे दृश्य डोळ्यांसमोर सतत दिसत होते.
१ आ. भावजागृतीचा प्रयोग करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : त्या वेळी मला भावजागृतीचा प्रयोग सुचला, ‘प.पू. गुरुदेव साक्षात् राम आहेत. मारुतिरायाप्रमाणे रामस्वरूप गुरुरायांना ‘राम राम’ म्हणत प्रदक्षिणा घालूया.’ मी त्याप्रमाणे केल्यावर माझा भाव आणखी जागृत झाला. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘मारुतिरायाही गुरुदेवांना माझ्या मागून प्रदक्षिणा घालत आहेत.’ त्यानंतर मी कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२३)
|