४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, उलट्या यांचा त्रास !
|
मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असे त्रास होत आहेत. वसतिगृहातील दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील पाण्याचे नमुने पडताळण्यासाठी मुंबई विद्यापिठाच्या अभियंता विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर त्रास होण्यामागील नेमके कारण सुस्पष्ट होईल.
‘अनेक विद्यार्थिनींना प्रामुख्याने उष्माघातामुळे त्रास झाला आहे. कलिना संकुलातील आरोग्य केंद्रात विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांना योग्य ती औषधेही देण्यात आली. आता त्यांची प्रकृती बरी आहे’, असे मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.