काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत ! – राम सातपुते, उमेदवार, महायुती
सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मशिदींतून काही फतवे निघत असल्याचा दावा केला आहे. ‘जिहादींना समवेत घेण्याची काँग्रेसची मानसिकता राहिलेली आहे. एम्.आय.एम्. पक्षाने उमेदवार दिलेला नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाडून काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत. त्याचा मी निषेध करतो. याच्या विरोधात येथील समाज एक होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहील’, असे प्रतिपादन राम सातपुते यांनी २१ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
राम सातपुते पुढे म्हणाले की, राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. मशिदीतून फतवे काढून राज्यघटनेला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत.