कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड (हवा असलेला) आरोपी’ घोषित !
अभिनेते सलमान खान यांच्या घरावरील गोळीबाराचे प्रकरण
मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना कह्यात घेतले आहे. त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच मुंबई पोलिसांनी कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याला ‘हवा असलेला (वॉन्टेड) आरोपी’ म्हणून घोषित केले आहे. मुंबई पोलीस लवकरच लॉरेन्सचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.