संभाजीनगरसह मराठवाड्याला वादळी पावसाने झोडपले !
लातूर येथे वीज पडून २ ठार, धाराशिव येथे १० शेळ्या ठार !
छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. लातूर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत २ घंटे गारपीट झाली. त्यात २ ठिकाणी वीज कोसळून २१ वर्षीय तरुणासह ६५ वर्षीय वृद्ध महिला ठार झाली, तसेच जिल्ह्यात ९ गुरे दगावली. धाराशिव येथे वीज पडून ५ गुरे आणि १० शेळ्या ठार झाल्या.
नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड जिल्ह्यांतही अवेळी पाऊस पडला. संभाजीनगर येथे वादळी वार्यासह अवेळी पावसाने तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचसमवेत बहुतांश शहरांतील वीजपुरवठा रात्री विलंबापर्यंत खंडित झाला होता. अग्नीशमन विभागाकडे ४० तक्रारी आल्या. त्यानंतर ८ वाहने, ११६ कर्मचारी २ जेसीबी यांचे साहाय्य घेण्यात आले. सायंकाळी अर्ध्या घंट्यांत १६.३ मिलिमीटर पाऊस पडला.