सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे
‘समाजामध्ये तयार असणार्या साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्यास समाजाला अधिक लाभ होऊ शकतो’, या विचाराने मी प्राधान्याने त्यांच्यासाठी ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण केले. या लिखाणानुसार साधना केल्यामुळे वर्ष २००२ ते वर्ष २०२४ या काळात, म्हणजे २२ वर्षांत १२७ हून अधिक साधक संत झाले आहेत आणि सहस्रो साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत. समाजाला आध्यात्मिक स्तरावर हा खूप मोठा लाभ झाला आहे. आता समाजातील सर्वसाधारण व्यक्तीही साधक व्हावी, तिने साधनेकडे वळावे यासाठी ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या संदर्भातील लिखाण करू लागलो आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.२.२०२४)