सलमान खान यांच्या घरी लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ‘कॅब’ पाठवणारा अटकेत !
मुंबई : कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ‘कॅब’ नोंदवून ती अभिनेते सलमान खान यांच्या वांद्रे येथील घरी पाठवल्याप्रकरणी गाझियाबादच्या रोहित त्यागी याला अटक करण्यात आली आहे. कॅबचालक संबंधित पत्त्यावर पोचला, तेव्हा कुणीतरी खोडसाळपणा करत असल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याने कुणी कोणतेही कृत्य करायला धजावतो, हेच खरे ! |