उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे दिवसाला १०० प्राणी-पक्षी घायाळ !
दिवसाला १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू
ठाणे – उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे दिवसाला १०० प्राणी-पक्षी घायाळ होत आहेत. ते चक्कर येऊन खाली पडतात. त्यामुळे पक्ष्यांचे पंख आणि काहींच्या पायांना इजा होत आहे. घायाळ झालेल्या प्राण्यांवर इतर प्राणी आक्रमण करतात. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होते.
उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.