ठाणे शहरात भ्रमणभाषची चोरी करणारा धर्मांध अटकेत !
धर्मांधावर २३ गुन्हे नोंद
भिवंडी – ठाणे शहरात भ्रमणभाषची चोरी करणारा अट्टल चोर रिजवान उपाख्य रिज्जो नबी इनामदार (वय ४१ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ४५ सहस्र रुपये किमतीचे एकूण १३ भ्रमणभाष जप्त केले आहेत.
रिजवानवर ठाणे शहराअंतर्गत भिवंडी, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात आणि रेल्वेत चोरी, जबरी चोरीचे एकूण २३ गुन्हे नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :पहिल्याच चोरीच्या वेळी कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम होय ! |