मुंबईत ५० झाडांवर विषप्रयोग केल्याचे उघड; गुन्हा नोंद
मुंबई – पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर अज्ञान व्यक्तीने विषप्रयोग केल्याचे उघड झाले आहे. पालिका अधिकार्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
१. काही वर्षांपूर्वी महापालिकेने पूर्व द्रुतगती मार्गावर पेल्टोफोरम, सुबाभूळ, पिंपळ आणि फॉक्स टेल पाम या प्रजातींच्या झाडांची लागवड केली होती. घाटकोपर परिसरातही अशी लागवड केली होती.
२. काही दिवसांपूर्वी महापालिकेचे अधिकारी घाटकोपर येथे झाडांची पहाणी करतांना तेथे झाडांवर विषप्रयोग झाला असल्याचे समजले; कारण यातील काही झाडे मृतावस्थेत आढळली. ४० ते ५० झाडे अचानक पूर्णपणे सुकून गेली होती.
३. पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली.