खांदेश्वर येथे अभियंत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक
पनवेल – खांदेश्वर येथील एका ४५ वर्षीय अभियंत्याची १५ लाख रुपयांची ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे फसवणूक झाली आहे. प्रथम गुंतवणुकीमध्ये ४ सहस्र रुपयांचा लाभ झाल्याने या अभियंत्याने १० बँकांच्या खात्यांमध्ये १५ लाख ६ सहस्र ६५७ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसात अभियंत्याला त्याची फसवणूक झाल्याचे समजले. सध्या या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअशी फसवणूक करणार्यांना सायबर पोलिसांनी शोधून कठोर शिक्षाच करायला हवी ! |