Action Against Gold Smugglers : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांची सोन्याची तस्करी करणार्यांवर कारवाई !
३ दिवसांत ५.७१ कोटी रुपयांचे ९.४८२ किलो सोने जप्त : ८ प्रवाशांना अटक !
मुंबई : मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी गेल्या ३ दिवसांत ५.७१ कोटी रुपयांचे ९.४८२ किलो सोने जप्त केले आहे. प्रवाशांचे शरीर, गुदाशय, हातातील सामान आणि प्रवाशांंनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये पाकीट ठेवून सोने लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असे सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नैरोबी, अदीस अबाबा आणि पॅरिसमधून मुंबईला जाणार्या १२ विदेशी नागरिकांना थांबवण्यात आले होते. त्यांनी गुदाशयात ६ सहस्र ६२७ ग्रॅम सोने लपवले होते.
संपादकीय भूमिका
विमानतळावर वारंवार होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |