PM Modi Haters : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा व्हिडिओ बनवणार्या रोहित कुमार याला मुसलमानांकडून बेदम मारहाण !
‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले !
म्हैसुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणारा व्हिडिओ बनवणारा रोहित कुमार या यूट्यूबरला कर्नाटकातील म्हैसुरूमध्ये मुसलमानांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्या अंगावर बिअर ओतण्यात आली आणि त्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देण्यास भाग पाडले.
Mu$l!ms thrash Rohit Kumar for making a video praising #PMModi
📍Mysuru Karnataka
Rohit forced to raise slogans of ‘Pakistan Zindabad’ and ‘Allah-hu-Akbar’
Is #Mysuru a part of India or #Pakistan that such cases are happening there❓
Read more : https://t.co/YU4y6MBEAR
The… pic.twitter.com/fn2R9MlW44
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2024
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा म्हैसुरूतील मेल्लाहल्ली गावचा रहिवासी आहे. त्याने पंतप्रधान मोदी यांची स्तुती करणारे एक गाणे प्रसारित केले होते. त्याने हे गाणे एका तरुणाला शेअर (प्रसारित) करण्यास सांगितले; पण तो तरुण मुसलमान आहे, हे त्याला माहीत नव्हते. तो तरुण रोहितची त्याच्या मित्रांशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने त्याला एका खोलीत घेऊन गेला. खोलीत प्रवेश करताच तेथील मुसलमान तरुणांनी त्याचे तोंड झाकले आणि हात मागून बांधले. पंतप्रधान मोदींवर गाणे बनवल्याविषयी मुसलमान तरुणांनी त्याला शिवीगाळ करणे चालू केले. त्यांनी त्याला ‘ पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सांगितले. त्यांनी रोहितच्या हातातील श्रीरामाचे छायाचित्र हिसकावून घेतले आणि त्याच्याशी गैरवर्तनही केले. त्यांनी त्याच्या डोक्यावर बिअर ओतली आणि त्याचे हात सिगारेटने जाळले. त्यांनी त्याला मारहाणही केली.
या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, असे म्हैसुरूचे पोलीस आयुक्त रमेश यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|