Sangrur Jail Violence : संगरूर (पंजाब) येथील कारागृहात बंदीवानांमधील हाणामारीत २ बंदीवान ठार, तर २ जण घायाळ
संगरूर (पंजाब) – येथील कारागृहात बंदीवानांमध्ये झालेल्या हाणमारीत २ बंदीवानांचा मृत्यू झाला, तर २ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हर्ष आणि धर्मेंद्र अशी मृत्यू झालेल्या बंदीवानांची कैद्यांची नावे आहेत, तर गगनदीप सिंह आणि महंमद शाहबाज यांची प्रकृती चिंताजनक आहे.
2 inmates killed, 2 injured in clashes 🥊👊 between inmates
👉 Accused are arrested and imprisoned to maintain law & order.
But if they continue being notorious even in the jail, it is deplorable for the #Police#PrisonReforms pic.twitter.com/8UBTk8hDYJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
सूत्रांनी सांगितले की, सिमरनजीत सिंग उपाख्य जुझारसह त्याच्या ८ साथीदारांनी महंमद शाहबाज आणि त्याच्या साथीदारांवर कटरद्वारे आक्रमण केले. सिमरनजीत सिंह हा जुझार टोळीचा प्रमुख आहे. तो अमृतसरच्या रसूलपूर कालेर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ३०२, ३०७ आणि खंडणीचे अनुमाने १८ वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तो जवळपास ६ वर्षांपासून कारागृहात आहे.
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आरोपींना अटक करून कारागृहात डांबले जाते; मात्र तेथेही ते अशा प्रकारचे कृत्य करत असतील, तर पोलिसांना हे लज्जास्पद आहे ! |