Karnataka Love JIhad Issue : पीडितेचे वडील असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकाला लव्ह जिहाद अस्तित्वात असल्याचे मान्य; मात्र गृहमंत्र्यांना अमान्य !
कर्नाटकातील लव्ह जिहादचे प्रकरण
हुब्बळ्ळी (कर्नाटक) : विवाहाच्या प्रस्ताव नाकारल्यामुळे फैयाज खोंडुनाईक या नराधमाने नुकतीच नेहा हिरेमठ या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. नेहाचे वडील निरंजन हिरेमठ हे काँग्रेस नेते आणि नगरसेवक आहेत. या घटनेनंतर कर्नाटकातील वातावरण तापले असून लव्ह जिहादच्या या प्रकरणाला हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिरेमठ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘‘अशा घटना वेगाने घडत आहेत. तरुण चुकीचा मार्ग स्वीकारत आहेत. हे कुणाच्याही संदर्भात घडू नये. मला वाटते की, लव्ह जिहाद वेगाने पसरत आहे. माता-भगिनींना घराबाहेर पडतांना काळजी घेणे आवश्यक आहे.’’ निरंजन हिरेमठ यांनी जरी या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हटले असले, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरन् यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे नसल्याचे म्हटले आहे.
Update on the Neha Hiremath Love Ji#ad case in Karnataka.
🎯 Criminals like Fayaz should be killed in an encounter.
– Labour Minister Santosh Lad.🎯 'Will reward Rs 10 lakh if Fayaz's head is cut off.' – Announcement by President of 'Jaya Karnataka' organization Ijari
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
(म्हणे) ‘नेहाची हत्या करण्यात दोन्ही बाजूंचे लोक सहभागी !’ – गृहमंत्री, जी. परमेश्वरन्
जी. परमेश्वरन् पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘फैयाजने कदाचित् नेहाला भोसकले असेल; कारण त्याला वाटले असेल की, नेहा दुसर्याशी लग्न करील. मला याविषयी अधिक ठाऊक नाही; पण या प्रकरणात दोन्ही बाजूंचे लोक सहभागी होते.
Update on the Neha Hiremath murder case in Hubballi, Karnataka
'People from both sides are responsible for the killing of Neha. Calling it love J!h@d is wrong – Home Minister G. Parmeshwara
👉 Congress, which often makes a fuss that 'Love J!h@d' is a hoax and is rather a… pic.twitter.com/xe7XqqkynB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
त्यामुळे हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही.’’ (नेहाच्या हत्येला एकप्रकारे हिंदूंनाही उत्तरदायी ठरवणारे काँग्रेसचे हिंदुद्वेषी आणि समाजघातकी गृहमंत्री ! – संपादक)
माझ्या मुलीसमवेत जे घडले, ते कुणासमवेत घडू नये ! – निरंजन हिरेमठ
पीडितेचे वडील निरंजन हिरेमठ पुढे म्हणाले, मी सर्व मातांना आवाहन करतो की, जर तुमची मुलगी महाविद्यालयात गेली, तर तिच्यासमवेत जा; कारण माझ्या मुलीसमवेत जे घडले, ते कुणाच्याही बाबतीत घडू नये, याची काळजी घ्या.
Update on the recent Love J!h@d case in Karnataka.
The victim's father Hiremath, also a corporator from #Congress, admits the existence of Love J!h@d, but the State Home Minister Parameshwar still denies.
👉 By rebuffing Love J!h@d, the HM is jeopardizing the security of girls… pic.twitter.com/154exnVjPI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2024
आजूबाजूची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मी राज्य सरकार आणि इतर सर्व नेत्यांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.
माझ्या मुलाला अशी शिक्षा मिळावी की, पुन्हा कधीही कुणी अशा प्रकारचे कृत्य करू धजावणार नाही ! – फैयाजचे वडील बाबासाहेब सुबानी
फैयाजचे वडील बाबासाहेब सुबानी यांनी या घटनेवरून म्हटले की, नेहाला माझा मुलगा फैयाज त्रास देत होता. फैयाजने केलेल्या कृत्यामुळे मला धक्का बसला आहे. फैयाजला अशी शिक्षा मिळावी की, पुन्हा कधीही कुणी अशा प्रकारचे कृत्य करू धजावणार नाही. नेहाच्या कुटुंबाची मी क्षमा मागतो. माझ्या मुलाने गुन्हा केला, हे मी मान्य करतो. फैयाज आणि नेहा यांचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता; पण माझा याला नकार होता.
असे कृत्य करणार्यांना चकमकीत ठार मारले पाहिजे ! – कामगार मंत्री संतोष लाड
दुसरीकडे कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी असे कृत्य करणार्यांना चकमकीत ठार मारले पाहिजे, तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी याविषयी विचार केला पाहिजे, अशी मागणी केली.
फैयाज याचे मुंडके छाटल्यास १० लाख रुपये बक्षीस देणार ! – ‘जय कर्नाटक’ संघटनेचे अध्यक्ष ईजरी यांची घोषणा
‘जय कर्नाटक’ संघटनेचे अध्यक्ष ईजरी यांनी आरोपी फैयाज याचे मुंडके छाटणार्याला १० लाख रुपये देण्यात येतील, असे घोषित केले आहे. हुब्बळ्ळी येथे वार्ताहरांशी ते बोलत होते. या संघटनेने २० एप्रिल या दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला लोकांकडून प्रतिसाद मिळाला. (सवंग लोकप्रियतेसाठी अशा कायदाद्रोही घोषणा देणार्यांवर कारवाई का होत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|