Dubai Floods Abu Dhabi Mandir : (म्हणे) ‘हिंदूंचे मंदिर बांधल्याने दुबईमध्ये पूर आला !’ – मुसलमानांचा हिंदुद्वेषी प्रचार !

सामाजिक माध्यमांतून धर्मांध मुसलमानांचा हिंदुद्वेषी प्रचार !

नवी देहली – दुबईसह संयुक्त अरब अमिरात या इस्लामी देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या पावसावरून सामाजिक माध्यमांतून जिहादी मानसिकतेचे मुसलमान दुबईत हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार करत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात दुबईतील पावसाची काही दृश्ये दाखवली असून यात म्हटले आहे की, ‘दुबईत मंदिर उघडताच वादळ आले आणि जोरदार पाऊस झाला. ज्या ठिकाणी अल्लाने मूर्तीपूजा बंद करण्यासाठी पैगंबर यांना पाठवले होते, आज त्याठिकाणी मूर्तींची पूजा चालू आहे.’

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @ISLAMIC_BOY345’ नावाच्या खात्यावरून प्रसारित केला गेला. यासह धर्मांध मुसलमानांकडून विरोधही केला जात आहे. ‘अरब देशांना अल्लाचे शुद्ध मार्गदर्शन द्यावे आणि त्यांनी असे प्रकार करू नयेत’, असे बोलले जात आहे.

पाकिस्तानी महिला पत्रकाराकडून धर्मांध मुसलमानांना विरोध

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी याविषयी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, हे इस्लामी ‘हवामानशास्त्रज्ञ’ दुबईत नव्याने बांधलेले हिंदु मंदिर पुराचे कारण कसे आहे, हे सांगतात. स्त्रियांविषयी असे म्हटले जाते की, जीन्स परिधान केलेल्या स्त्रिया  भूकंपाचे कारण आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता काही भारतीय सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ते म्हणतात, ‘भारतामुळे इतर देशांमध्ये पाऊस पडतो.’

संपादकीय भूमिका

जर दुबई आणि आखाती देशांतील वाळवंटामध्ये असा पाऊस पडत असेल, तर मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिराविषयी कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे ! जेथे जेथे जगात दुष्काळ पडतो, त्या सर्वच ठिकाणी आता मंदिरे बांधायला हवीत !