Love Jihad In Chhatrapati SambhajiNagar : ‘घरातील प्रकरण आहे’ असे सांगून २ वर्षांत १० वेळा पोलिसांकडून हिंदु तरुणीची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास टाळाटाळ !
|
छत्रपती संभाजीनगर : येथे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या २७ वर्षीय हिंदु तरुणीवर मुसलमान कुटुंबांतील मंडळींकडून वारंवार अत्याचार होत होते. त्यानंतर या संदर्भात गेल्या २ वर्षांत हिंदु तरुणीने १० वेळा सातारा पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘घरातील प्रकरण आहे’, असे सांगत पोलिसांनी हिंदु तरुणीची तक्रार प्रविष्ट करूनच घेतली नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी हिंदु तरुणीला घंटोन्घंटे पोलीस ठाण्यात नुसते बसवून ठेवले. या प्रकरणात ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’च्या पत्रकाराने हिंदु तरुणीला साहाय्य केल्यानंतर ११ एप्रिल या दिवशी सातारा पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी ताहेर पठाण विरुद्ध बलात्कार आणि फसवणूक असा गुन्हा नोंद केला आहे.
काय आहे प्रकरण ?येथील धर्मांध ताहेर पठाण, तय्यब पठाण, आयेशा पठाण आणि लैलाबी पठाण यांनी हिंदु तरुणीवर अत्याचार करून तिला जाणीवपूर्वक फसवून इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले, तसेच हिंदु तरुणीला गोमांस खायला देऊन तिला कुराणही शिकवले. या प्रकरणी वरील धर्मांधांच्या विरोधात विविध कलमांन्वये छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |
‘आरोपींच्या विरोधात नोंद केलेल्या कलमांनुसार अन्वेषण केले जाईल’, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी दिली. आरोपी ताहेर पठाणसह अन्य ३ जणांच्या विरोधात कलम ३७६, ४२०, ५०४ आणि ५०६ कलमांनुसार गुन्हा नोंद आहे.
संपादकीय भूमिका
|